औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर जोरदार धडक

Foto
वाळूज येथील औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर एका विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकी ला कार ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंपनी कामगार जखमी झाल्याची घटना युपिएल किटनाशकेच्या
गोडावुन जवळ आज  सकाळी ८:३० वाजता घडली . घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने गंभीरपणे जखमी झालेल्या कामगारांस १०८ रुग्णवाहिका द्वारे घाटी
दवाखान्यात दाखल केले आहे .वाळूज च्या पुढे असलेल्या कंपनीत कामगार म्हणून काम करत असलेला कामगार हा दुचाकी क्रमांक एम एच २० ई डब्ल्यू ७३७८
विरुद्ध दिशेने येत होता . औरंगाबाद कडून अहमदनगर कडे जात असलेल्या स्विफ्ट कार एम एच २० डी व्ही क्रमांक ०४२४ च्या चालकाने त्यास उडवले . धडक इतकी जबरदस्त होती की जखमी दुचाकी वरून उडून महामार्गावर असलेल्या पुलावरून खाली कोसळला सदरील व्यक्तीची ओळख पटलेली नाही